शिवेंद्रराजेंच्या विजयात ‘लाडक्या बहिणींचा’ सिंहाचा वाटा असेल ;
सौ.वेदांतिकाराजे

स्टार ११ महाराष्ट्र —–
जावलीत गावभेट दौऱ्यात माता-भगिनींशी साधला संवाद
सातारा- महायुती सरकारने विविध कल्याणकारी योजना आणल्याने ग्रामीण भागातील जनता सुखावली आहे. आज लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील माता- भगिनींचे आर्थिक सबलीकरण होण्यास मदत झाली आहे. आ. शिवेंद्रराजेंच्यामुळे सातारा जावली मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती विकासाच्या प्रवाहात आली आहे. या निवडणुकीत शिवेंद्रराजेंना विक्रमी मतांनी विजयी करण्यात माता- भगिनींचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सौ. वेदांतिकाराजे भोसले पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघात प्रचार करत आहेत. जावली तालुक्यात त्यांनी गाव भेट दौरा करून विविध गावातील मतदार आणि माता- भगिनींशी संवाद साधला. यावेळी सरताळे ग्रामपंचायतीचे सदस्य निशांत नवले, सुचिता काळे, रोशना नवले, सारिका काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्वत्र त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विकासकामांच्या बाबतीत शिवेंद्रराजे कुठेही कमी पडले नाही आणि कधीच कमी पडणार नाहीत. आता सर्व जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. जावलीतील जनता शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून विरोधकांना आपली ताकद दाखवून देऊ आणि शिवेंद्रराजेंना १ नंबरच्या मताधिक्याने विजयी करू, असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला.