
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——-
मेढा. दि. ०६ . पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून कीर्तनाचे आयोजन व यावेळी जमलेल्या शेकडो लोकांना सत्कारामध्ये शाल-श्रीफळ देण्याऐवजी झाडांच्या रोपांचे वाटप करून अनोखा सामाजिक संदेश देण्याचे काम गजवडी येथिल कदम परिवार करीत असून हा उपक्रम स्तुत्य असून याचे समाजाने अनुकरण करायला हवे असे मत विश्वंभरबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अतुल महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
गजवडी ता.सातारा येथिल बाबामहाराज गजवडीकर यांच्या पत्नी वै.सुमन कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात विश्वंभरबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. अतुल महाराज देशमुख (गांजे) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रामाला सातारा जिल्ह्यातून अजिंक्यतारा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन नामदेवराव सावंत,सरपंच परिषदेचे अरूण कापसे,रविंद्र सावंत,सर्जेराव सावंत,श्रीरंग देवरूखे,प्रा.संभाजीराव शेळके,संभाजीराव पवार,पत्रकार विकास काटकर, चिंचणीचे सरपंच जितेंद्र सावंत, इ.मान्यवरांसह वारकरी,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबामहाराज गजवडीकर यांच्या कन्या जवळवाडी ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ व त्यांच्या भगिनी रेखा जाधव,आरती जाधव,मुक्ता शिंदे,संजिवनी पवार,अनुजा शेलार यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्षे अनुक्रमे लिंबू-बेल,कडीपत्ता आणि या वर्षी शेवगा अशा शेकडो झाडांच्या रोपांचे वाटप आलेल्या लोकांना करण्यात येते.
अतुल महाराज देशमुख, नामदेवराव सावंत,संभाजी शेळके यांनी यावेळी बोलताना या उपक्रमाचे कौतुक करून समाज्याने अशा उपक्रमाचे अनुकरण करायला हवे असे गौरव उदगार काढले.”नको शाल,नको श्रीफळ आता,करू वृक्षारोपण नटवू हिरवाईने धरती माता।” हाच संदेश देवूनआईच्या स्मृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याची भावना वर्षाताई जवळ यांनी व्यक्त केल्या.