
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा. दि.१७.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर द्वारा संचालित श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज ,मेढा येथे राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत जागतिक वन दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला. वनांची निर्मिती,वन संरक्षण आणि संवर्धन याचे महत्त्व भावी नागरिकांना कळावे म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्राध्यापक डॉ.शेखर मोहिते सर वनस्पती विभागप्रमुख एल.बी.एस.कॉलेज, सातारा यादव जे.व्ही.कायम वनमजूर सामाजिक वनीकरण मेढारणदिवे आर.बी.सामाजिक वनीकरण मेढा भिलारे एम. व्ही. रिटायर्ड वनमजूर सामाजिक वनीकरण मेढा उपस्थित होते.

डॉ.मोहिते सर यांनी PPT च्या माध्यमातून कास पठाराची माहिती, विविध वनस्पतींची माहिती, वनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा चे प्राचार्य श्री. पाटील बी.बी.सर यांनी पर्यावरणामध्ये परस्पर पूरक बाबी कोणत्या, मनुष्य प्राणी पर्यावरणावर कास अवलंबून आहे. पर्यावरण संतुलित राखण्याकरिता आपण स्वतःच्या स्तरावर काय केले पाहिजे, लोक सहभागातून आपण वनांचे संरक्षण कसे केले पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.वायदंडे मॅडम यांनी केले त्यामध्ये राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली व त्याचा उद्देश काय आहे याची सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तोडकर मॅडम यांनी केले तर आभार श्री.पवार डी व्ही सर यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.