शैक्षणिकसातारा

आराध्य प्रदीप कासुर्डे बाल क्रीडा स्पर्धेत तालुक्यात प्रथम

स्टार ११ महाराष्ट्र



केळघर.  पंचायत समिती जावली शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बालक्रीडा स्पर्धेत वरोशी येथील प्राथमिक शाळेने चांगली कामगिरी करत यश संपादन केले आहे.

बालक्रीडा स्पर्धेत आराध्य प्रदीप कासुर्डे हिने लांब उडी स्पर्धेत ३.३७ मी.लांब उडी मारत मोठ्या गटात तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.दुर्वा राजेंद्र पवार
या विद्यार्थिनीने  तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.यांचेसह शाळेतील इतर विध्यार्थी यांनीही उत्कृष्ट खेळ केला.

मुख्याध्यापक प्रभाकर पाडळे, सुनिल धनावडे,नीलिमा धनावडे, माधवी कांबळे,यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व शाळेचे यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे,भाजपचे जेष्ठ नेते मोहनराव कासुर्डे,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी मिलन मुळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य,ग्रामस्थ यांनी आराध्याचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!