
मेढा,दि.१५. जवळवाडी (मेढा) येथील सिध्देश विष्णू जवळ (वय १८ ) यांचे आज सकाळी साडे सातच्या दरम्यान मेढा मोहाट पुलाच्या खालच्या बाजूस कण्हेर जलाशयाच्या नदी पात्रात पोहत असताना पाण्याच्या फुगवटयाच्या वरून अगदी दीड ते दोन फुट अंतरावरून गेलेल्या वीजेच्या तारेला पोहताना हात लागल्याने शॉक लागून जागीच पाण्यात बुडाला असून त्याचा शोध घेण्यासाठी रेस्क्यु टिम बोलविल्या आहेत.
सिध्देश हा आई-वडीलांना एकुलता एक मुलगा आहे. जवळवाडी-मेढा परिसरातील लोक नदी काठावर उभी असून कण्हेर धरण भरलेले असल्याने महाबळेश्वर रेस्क्यु टिम शोध मोहीम राबवीत असून अजूनही सापडलेले नाही.
काल सायंकाळी ६ वा.पर्यंत शोध मोहीम सुरु होती.त्यानंतर ती थांबविण्यात आली.
महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकार्यांनी वेळीच लक्ष या ठिकाणी दिले असते तर निष्पाप जीव गेला नसता.पाण्याच्या लाटा तारांना चिटकून अनेक वेळा स्ट्रीप होवून लाईन बंद होत होती. गतवर्षापासून याबाबत महावितरणकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत.शेकडोजण येथे पोहण्याचा आनंद घेत असतात पण धोका असूनही या बाबत साधा फलकही महावितरणने या ठिकाणी लावला नाही हे खेद जनक आहे.
श्री विलासबाबा जवळ
माजी राज्याध्यक्ष व्यसन मुक्त संघ
सिध्देश हा प्रत्येक सार्वजनिक कार्यात हिरीरीने सहभागी होतो यामुळे जवळवाडी गावात व मित्रांमध्ये तो अत्यंत प्रिय आहे. त्याच्या कुटुंबांसह संपूर्ण जवळवाडी गाव चिंतातूर असून सर्व संपूर्ण मुंबईकर सुध्दा मिळेल त्या वहानाने गावाकडे आले आहेत.आज सकाळ पासूनच ग्रामस्थ व युवकांनी पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.आज महाबळेश्वर ट्रेकर्स सोबतच पुण्यावरून पाणबुड्या सुध्दा बोलविण्यात आल्या आहेत.