मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना ; पांचगणी येथून मोटारीने प्रयाण

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——
मेढा.दि.२५ : महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या जन्मगावी दरे येथे गेली तीन दिवस मुक्कामाला होते. आज सकाळी ते मुंबईला जाताना पांचगणी येथील हॉटेल रवाईन येथे काही काळ थांबले होते. तेथे भोजन करून वाई मार्गे मुंबईला रवाना झाले.
यावेळी समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, गुरेघरचे सरपंच रमेश चोरमले हे होते. यावेळी रवाईन हॉटेल येथे किशोरभाई पुरोहित, मेहुल पुरोहित, गणेश कासूर्डे, सुरेश मडके यांनी त्यांचेशी संवाद साधला.
दरम्यान कोयना जलाशयामध्ये गाळाची भर आधीक होऊ लागली असुन हि सुपीक गाळ युक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असुन शेतकऱ्यांनी हा गाळ माती काढुन आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधीक बळ मिळेल तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणी साठ्यात वाढ होईल त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुंख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्र्या सोबत विविध खात्यांचे सचिव, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पोलिस प्रमुख समीर शेख, आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसह हाजारो नागरीकांनी दरे या दुर्गम गावामध्ये हजेरी लावल्याने गावाला वर्षा निवासस्थाना सारखे स्वरूप प्राप्त झाले असुन मुख्यमंत्री रविवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.