
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ——-
सातारा. दि.२५. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्ताने सर्वत्र मोदी ऍट ९ हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सातारा येथे रविवार दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सभेला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील,विधानपरिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर,जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, सातारा-जावलीचे आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान,या सभेपूर्वी दुपारी ४.३० वा.सर्व मान्यवर कृष्णानगर येथील सातारा शासकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा आढावा घेणार आहेत.या दोन्ही कार्यक्रमांना भाजपचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे,असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.