मा. मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जावली तालुका शिवसेना,युवासेनेच्यावतीने समाजपयोगी उपक्रमांनी साजरा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
केळघर.दि . ३० स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा यशस्वीपणे सांभाळनारे प्रेमळ व सर्वसामान्यांसाठी काम करणारं,व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे.महाआघाडी सरकारचे नेतृत्व करत असतांना आपल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जीवदान देण्याचा प्रयत्न करणारे मा. मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जावली तालुका शिवसेना,युवासेनेच्यावतीने मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे,अल्पोहार वाटप करत समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी युवासेनेचे तालुकाध्यक्ष विलास भणगे,जीवन शिंदे,नयन ,कासुर्डे पंकज ,प्रवीण कासुर्डे ,सतीश शिर्के , संजय कासुर्डे, अनिकेत कासुर्डे यांच्यासह तालुका शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते .