राजकीय

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धा; दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण

– क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

मुंबईदि. ३० : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, दहिहंडी उत्सवप्रो. गोविंदा लीगमधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊनगोविंदांचा मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.

यासाठी शासन निर्णय १८ ऑगस्ट२०२३ नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या ५०,००० गोविदांव्यतिरिक्त अतिरिक्त आणखी २५,००० गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.१८ लाख ७५ हजार  इतका निधी अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास  मान्यता देण्यात आली असल्याचे  सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!