सामाजिक

चांगली माणसं आजही समाजात आहेत..! श्रीराम नानल

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

मेढा.दि.३०.चांगली माणसं आजही समाजात आहेत म्हणून देश चालू आहे. चांगल्या गोष्टी साठी देणारे भरपूर आहेत. पण त्याचा उपयोग करून घेतला पाहीजे.तंत्रज्ञानामुळे समाज आज बदलत चालला आहे. आपणही बदल | स्विकारला पाहीजे . तरूण युवा पिढीचा बुध्यांक चांगला असून त्यांना चालणा देण्याची गरज आहे . असे प्रतिपादन जन वाचक चळवळीचे मुख्य समन्वयक श्रीराम नानल यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष ,व संचालक यांचेकडे पुस्तके भेट देताना श्रीराम नानल, उदयजी गोडबोले , विनय थत्ते, व मान्यवर

जनवाचक चळवळ सातारा यांचे वतीने मेढा येथील महात्मा गांधी वाचनालय तालुका अ वर्ग या वाचनालयास स्पर्धा परिक्षा व तत्सम हजारो रूपयांची पुस्तके भेट देण्यात आली याप्रसंगी वाचनालयाच्या स्व. विजयाताई थत्ते सभागृहामध्ये आयोजीत केले “पुस्तक भेट ” कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम नानल बोलत होते.

वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास करसल्लागार उदयजी गोडबोले , विनयजी थत्ते, किरणजी गाडे, माजी नगरसेवक विकास देशपांडे, वाचनालयाचे कार्याध्यक्ष नारायण शिंगटे, विठ्ठल देशपांडे, अशोक दिक्षीत, मेढा शाळेचे धनावडे गुरुजी, विद्यार्थी , संचालक, कर्मचारी उपस्थीत होते.

याप्रसंगी श्रीराम नानल अधिक माहिती देताना म्हणाले, डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मी जन वाचक चळवळीचा प्रारंभ केला आहे. ज्यांच्याकडे पुस्तके आहेत ती स्वखर्चाने गोळा करून दुर्गम भागातील वाचनालयांना भेट देत असतो. या चळवळीस अनेकांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगीतले . यावेळी त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी आणलेली हजारो रुपयांची पुस्तके संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे यांचेकडे सुपुर्त केली.

प्रारंभी सुरेश पार्टे यांनी मान्यवरांचे स्वागत केले .विकास देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.तर प्रास्ताविक नारायण शिंगटे यांनी मानले. कार्येक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेचे सचिव धनंजय पवार व कर्मचाऱ्यांनी यांनी केले होते.
फोटो…
संस्थेचे अध्यक्ष ,व संचालक यांचेकडे पुस्तके भेट देताना श्रीराम नानल, उदयजी गोडबोले , विनय थत्ते, व मान्यवर

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!