स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.०९. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्ष्याचे बळकटीकरण करणे, नूतन युवक सदस्य नोंदणी करणे, रखडलेल्या कामांचा पाठपुरावा करणे यासाठी सातारा जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदांवर नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार जिल्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर,आ.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या नेतृवाखाली सातारा – जावली विधान सभा मतदार संघातील नूतनपदाधिकारी निवडी संघटन मजबूत करण्याकरिता आज या निवडी करण्यात आल्या.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अभ्यासु, प्रशासनाशी जवळीक असलेले साधू चिकणे यांची जावली तालुकाध्यक्ष पदी तर सातारा तालुकाध्यक्ष पदी शशिकांत वाईकर व सातारा शहराध्यक्षपदी ऍडव्होकेट बाळासाहेब बाबर यांची यावेळी निवड करण्यात आली.
पक्षाच्या इतर विभागाच्या प्रमुख निवडी देखील यावेळी करण्यात आल्या. महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी सौ. संगीता देशमुख,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पदावर शमशुद्दीन सय्यद, कोंडवे तसेच ओ.बी.सी. विभाग शहर
अध्यक्ष पदावर बनकर, सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र शेलार, कार्याध्यक्षपदी महेश पाटील,सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम अशा निवडी करण्यात आल्या.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन अजित पवार साहेबांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी भक्कमपणे आज उभे आहेत. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आज या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी यावेळी सांगितले.
या निवडीनंतर बोलताना साधू चिकणे म्हणाले की, आपण मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. नियुक्तीनंतर जावली तालुक्यात निश्चितच पक्षसंघटन वाढीसाठी कटिबद्ध असून पक्षाची ध्येय – धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल.