
स्टार ११ महाराष्ट्र
जनतेने दिलेला कौल हा लोकशाहीचा कणा आहे, आणि तो आम्ही नम्रपने स्वीकारत आहोत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला,पाठिंबा दिला,प्रेम दिलं, आशीर्वाद दिले त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.
ही निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा नव्हती तर जनतेच्या अपेक्षा, स्वप्नं आणि भविष्यासाठीची दिशा ठरवणारी लढाई होती. प्रत्येक मतदाराने आपला अमूल्य वेळ काढून मतदान केलं, हेच लोकशाहीचं खऱ्या अर्थाने यश आहे.
आम्हाला यश मिळो अथवा अपयश,पण जनतेचा निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च असतो, आणि तो आम्ही नम्रपने स्वीकारतो. पराभव स्वीकारण्याची ताकद हीच खरी लोकशाहीची ओळख आहे, आणि त्या ताकदीतूनच पुन्हा नव्या जोमाने उभं राहण्याची प्रेरणा मिळते.
ही निवडणूक आम्हाला अनेक गोष्टी शिकवून गेली
जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांची निष्ठा, आणि प्रत्येक मतामागे असलेली अपेक्षा ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या त्या विश्वासाची जाणीव आम्हाला आहे. तुमचं एक-एक मत हे आमच्यासाठी अमूल्य आहे, आणि तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, हीच आमची भूमिका आहे.
ज्या मतदारांनी विरोधात मतदान केलं,त्यांचाही आम्ही तितक्याच आदराने सन्मान करतो आहे.
लोकशाहीमध्ये मतभेद असले तरी उद्देश एकच असतो, विकास आणि जनकल्याण.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने,पदाधिकाऱ्यांनी, समर्थकांनी जीव ओतून काम केलं.ऊन,वारा थंडी याची पर्वा न करता गावोगाव फिरून,घरोघरी पोहोचून, जनतेशी संवाद साधला त्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनापासून सलाम.
तुमची मेहनत, तुमचा उत्साह, आणि तुमचा विश्वास यामुळेच ही लढाई आम्ही सन्मानाने लढू शकलो.ही लढाई संपलेली नाही, तर नव्या विचारांची सुरुवात आहे. आज जरी निकाल आमच्या बाजूने नसला, तरी जनतेच्या सेवेतून आम्ही कधीही मागे हटणार नाही.

राजकारण हे पदासाठी नाही, तर जनतेसाठी असतं हा विचार घेऊन आम्ही पुढेही काम करत राहू.
आजचा पराभव हा उद्याच्या विजयाची पहिली पायरी आहे, असं मानून आम्ही आत्मपरीक्षण करू, चुका दुरुस्त करू, आणि अधिक ताकदीने पुन्हा जनतेसमोर उभे राहू.
जनतेच्या प्रश्नांपासून दूर न जाता, त्यांच्या दुःखात सहभागी होऊन, त्यांच्या आनंदात भाग घेऊन,आम्ही कायम तुमच्यासोबत राहू.
मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे, पण मतदारांचा विश्वास अजून जिवंत आहे, हीच आमची खरी ताकद आहे.लोकशाहीवर आमचा ठाम विश्वास आहे, आणि त्या लोकशाहीच्या चौकटीत राहूनच आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत.

ही निवडणूक संपली आहे,पण जनतेशी असलेलं आमचं नातं संपलेलं नाही.
या धक्कादायक निकालानंतर अनेक निष्ठावंतांच्या डोळ्यातील अश्रू हे महाराज साहेब व आमच्या विषयीच्या भावनांना अधिक बळ देतील.पद असो वा नसो, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्यासाठी आहोत, आणि तुमच्यासाठीच राहणार आहोत.
जनतेने दिलेल्या प्रत्येक मताला मानाचा मुजरा,
लोकशाहीच्या प्रत्येक निर्णयाला आमचा सलाम,
आणि भविष्यात अधिक सक्षम, अधिक प्रामाणिक, अधिक लोकाभिमुख नेतृत्व घडवण्याची आम्ही आज पुन्हा एकदा शपथ घेतो…आमचे दैवत आदरणीय महाराज साहेब यांनी विश्वास ठेवून मला संधी दिली त्यात मी कमी पडलो याचा खेद नक्कीच आहे पण इथून पुढे महाराज साहेबांसाठी व समाजासाठी जे करत आलोय ते दुपटीने करत राहीन असा आपनास विश्वास देतो.
ज्ञानदेव रांजणे
सर्वांचे मनपूर्वक आभार



