मेढा नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विकास देशपांडे विराजमान; शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते स्वीकारला पदभार

मेढा.दि.१८. मेढा नगरपंचायतीच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री. विकासजी देशपांडे यांची मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, आज त्यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
“विकास देशपांडे यांच्या अनुभवाचा मेढा नगरपंचायतीला नक्कीच फायदा होईल.सामान्य जनतेची कामे अधिक वेगाने होतील, असा विश्वास वाटतो.”असे यावेळी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.विकास देशपांडे यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवून त्यांना पुढील वाटचालीस महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती मेढ्याच्या राजकारणातील विकास देशपांडे यांच्यावरील विश्वास अधोरेखित करणारी ठरली.पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना विकास देशपांडे यांनी मेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रसंगी नेते अमितदादा कदम,जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ बाबा शिंदे,उपसभापती गोरख जी महाडिक,नगराध्यक्ष सौ रुपालीताई वारागडे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे,बांधकाम सभापती शिवाजीराव देशमुख,आरोग्य सभापती नितीनजी मगरे, महिला बालकल्याण सभापती आनंदीताई करंजेकर, नगरसेवक श्री शिवाजीराव गोरे,श्री हरिश्चंद्र तीवाटणे,श्री सुशांत कांबळे, श्री धनंजय पवार,नगरसेविका तेजस्विनी इगावे, अनघा करंजेकर,सुनिता तांबे,पुष्पा मुकणे,युवा नेते संतोषजी वारागडे मंडल अध्यक्ष मारुती चिकने संकेत करंजेकर भाजप शहराध्यक्ष संजय सपकाळ माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ मुख्याधिकारी अजिंक्य पाटील,विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.



