अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने तब्बल ६०० महिला कामगारांना रेनकोट वाटप

स्टार११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
सातारा दि.२२ मोहन जगताप..स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी चळवळीला वेळोवेळी न्याय देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या २२ जुलै रोजी असणारा वाढदिवस हा विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने करण्यात आलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत माथाडी कामगार नेते, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा), भाजपा प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खंदे समर्थक मा.ना.नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून दि. १९ जुलै २०२३ रोजी माथाडी भवन येथे आयोजित सेवा कार्यक्रमात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील तब्बल ६०० महिला पालावाला कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले.
“कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात काम करणाऱ्या महिला पालावाला कामगार या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असतात. महिला पालावाला कामगार या स्वतः कुटूंब चालवतात व कुटुंबातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा अधिक मेहनत घेत असतात. बऱ्याच वेळा महिला कामगारांना पावसाळ्यात पाऊसा पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रेनकोट विकत घेणेसुद्धा जिकिरीचे असते. परिणामी त्यांना बऱ्याच आरोग्याच्या समस्या उदभवत असतात, ही बाब लक्षात घेऊन अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या वतीने महिला पालावाला कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे.” अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) मा.ना.श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास प्राना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ.प्राची पाटील, न.मुं.म.पा नगरसेविका सौ.भारती पाटील, भाजयुमो नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री.दत्ता घंगाळे, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक श्री.विजय राणे, अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे वरिष्ठ पदाधिकारी श्री.पोपटराव देशमुख, महिला कार्यकर्त्या सौ.सुरेखा म्हात्रे, सौ.उमा शेलार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.