
स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——–
सातारा . दि .२८ सातारा जिल्हयातील डोंगराळ भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मूसळधार पावसामूळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भूजलाचे निरिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.आपल्या आसपासच्या विहिरी, विंधन विहिरी (बोअर) जर 3 तासांहून अधिक काळ ओासांडून वाहत असतील तर ही दरड कोसळण्याची चाहूल समजावी.जर अचानक अनेक नवीन झऱ्यांचा उगम आपल्याला आढळत असेल, झऱ्याच्या प्रवाहामध्ये पाचपट अथवा अधिक वाढ झालेली दिसत असेल अथवा झऱ्याच्या पाण्याचे तापमान हे नैसर्गिक तापमानापेक्षा साधारण 5 अंश से.पेक्षा अधिक भासत असेल तर हि सुध्दा धोक्याची घंटा समजावी.
अतिवृष्टीमूळे झाडे, विदयुत पोल, तारांची कुंपणे, कलणे/तिरका होणे, इ. लक्षणे दिसू लागल्यास.
पक्षी व जनावरांच्या वर्तणूकीमध्ये अचानक बदल होणे (वेगळा आवाज काढणे/किंकाळणे, पायांनी जमिन उकरणे, पक्षी एकत्रित येणे इ.)
घरातून जमिनीतून पाण्याचे पाझर / उफळा फूटणे अथवा झरे निर्माण होणे. व घरातील फरशा उचकटणे.
जमिनीला नवीन ठिकाणी पाझर फुटणे.नियमित येणाऱ्या झऱ्यातून अचानक गढूळ पाणी येऊ लागणे.भात खचरांना भेगा पडणे.
वरील सर्व प्रकारची लक्षणे अतिवृष्टीच्या कालावधीत जाणवत असतील तर तेथील नागरिकांनी त्या ठिकाणापासून किमान 500 मीटर दूर सुरक्षित ठिकाणी स्वत:हून स्थलांतरित होणे अपेक्षित आहे. आणि अशा बाबीं निदर्शनास आलेस स्थानिक प्रशासनास (तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक इ.) यांचे निदर्शनास आणून दयाव्यात