सामाजिक

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार

राज्य शासनाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——- 
सातारा दि. 27.         सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार देण्यासाठी राज्य शासनाने स्पर्धा आयोजित केली असुन त्यासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त/स्थानिक पोलिस स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या मंडळांना सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई मेलवरती दि. 5 सप्टेंबर 2023 पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
                            ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या मंडळांची प्रत्यक्ष पहाणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नियुक्त केलेली जिल्हास्तरीय समिती करुन जिल्ह्यातून एका मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करेल. राज्यातील पहिल्या 3 विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडुन प्रथम क्रमांकास रु. पाच लक्ष, द्वितीय क्रमांकास रु. 2.50 लक्ष व तृतीय क्रमांकास रु. एक लक्ष रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या जिल्हयातील एका मंडळास रु.25 हजार चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. निकष आणि विहित अर्ज महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या शासन निर्णय क्र. पुलदे 2023/प्र.क्र.1/सां. का. 2. दि. 04 जुलै 2023 मध्ये असुन जिल्ह्यातील जास्तीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
000000

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!