सामाजिक

महिला व कार्यकर्त्यांना सोबत घेवूनअवैध व्यवसायिकांवर कारवाई करून दारूचा साठा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांना भेट देणार

व्यसन मुक्त संघटनेचे मा.राज्याध्यक्ष विलास बाबा जवळ

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——–

 

सातारा दि.२९. अवैध दारू व मटका व्यवसाय १५ऑगस्ट २०२३ पुर्वी बंद झाले नाहीत तर व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून महिला व कार्यकर्त्यांना सोबत घेवून या व्यवसायिकांवर कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांकडून दारूसाठा पकडणार व जमा झालेला सर्व अवैध दारूचा साठा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांना भेट देणार असल्याचे निवेदन व्यसन मुक्त संघटनेचे मा.राज्याध्यक्ष विलास बाबा जवळ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सांगितल्या असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

जावळी तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू व मटका व्यवसाय सुरू असून या व्यवसायिकांना नेमके पाठबळ कोणाचे? सर्व सामान्य जनतेला दिसत असलेले हे व्यवसाय उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाला का दिसत नाहीत असा सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.२६ जानेवारीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला जात असताना मेढा येथे अवैध दारू विक्रेत्याला पकडून आम्ही मेढा पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर काही दिवस पोलिस अधिकार्‍यांकडून कारवायांचा धडाका सुरू होता.पण त्यानंतर या कारवाई थंडावत गेल्या आहेत.जावली तालुक्यातील अनेक गावात हे अवैध व्यवसाय सुरू असून काही गावात तर हातभट्टीची दारू ही सुरू आहे. मेढा,कुडाळ,करहर या बाजारपेठांच्या गावात पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हे व्यवसाय सुरू असून त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे.

जावळी तालुक्यातील रणरागिणी महिला भगिनींनी १४ वर्षापूर्वी संपूर्ण देशात सुवर्ण ईतिहास घडविला.१० महिने २३ दिवसात संपूर्ण जावळी तालुक्यातील ६ गावातून १३ दारूची दुकाने ब महिलांनी मतदान करून बंद केली. तेव्हांपासून अनेक महिला,अनेक संघटना त्याच बरोबर गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांचे मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघटना वारंवार आंदोलन करीत असून तेवढ्यापुरते उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासन कारवाई केल्याचे दाखवितात आणि थोड्यादिवसात परत येरे माझ्या मागल्या सुरूच असते.
उत्पादन शुल्क विभागाने खरंतर या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करायला हवी.
तसेच त्यांना अवैध विक्रीसाठी देशी-विदेशी दारू पुरवठा करणार्‍या सातारा येथिल लायसन्स धारक दुकानांवर कारवाई करायला हवी. उत्पादन शुल्क विभागाची गाडी महिन्यातून एकदा या अवैध विक्रेत्यांना भेटण्यासाठी येते असे लोकंं बोलतात मग कारवाई का होत नाही? मेढा पोलिस स्टेशनला नविन कारभारी मिळाल्यावर लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मा.जिल्हा पोलिस प्रमुखांच्या भूमिकेनुसार सुरवातीला धडाधड कारवाया झाल्या. पण गेल्या चार-पाच महिन्यात तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असेच काहीसे सुरू असल्याने अगदी मेढ्याच्या व कुडाळच्या भर बाजार चौकात सुध्दा मटका व अवैध दारू व्यवसाय जोमात सुरू आहेत.
उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाकडून या अवैध दारू विक्रेते व मटका व्यावसायिकांवर कारवाई होणार नसेल त्यांना व्यावसायिकांचे अड्डे सापडत नसतील तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही.

१५ ऑगस्ट २०२३ पुर्वी हे व्यवसाय बंद झाले नाहीत तरआम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून महिला व कार्यकर्त्यांना सोबत घेवून या व्यवसायिकांवर कारवाई करणार आहोत आम्ही स्वतः कार्यकर्त्यासोबत अवैध दारू विक्रेत्यांकडून हा दारूसाठा पकडणार आहोत.जमा झालेला सर्व अवैध दारूचा साठा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई यांना भेट देणार असून सदर आंदोलनात कोणत्याही कार्यकर्त्यांच्या जिवीतास धोका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनावर राहील. निवेदनाचा गांभिर्यपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्या वतीने मा.राज्याध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!