सामाजिक

राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण बगाडे यांच्याकडून फळे व बिस्कीटांसह शालेय साहित्याचे वाटप.

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ———

मेढा. दि. २९ . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. दिपक भाऊ निकाळजे यांचा वाढदिवस 27 तारखेला होता इर्शाळवाडी जिल्हा रायगड या ठिकाणी घडलेली दुर्घटना तसेच महाराष्ट्रामध्ये वाढत्या पावसामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाल्याने वाढत्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमुळे दीपक भाऊ निकाळजे यांनी वाढदिवस न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

सातारा जिल्हा अध्यक्ष आयु.दादासाहेब ओव्हाळ यांच्या आदेशाने सामाजिक बांधिलकी जोपासत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे सातारा जिल्हा सचिव आयु किरण बगाडे यांनी दीपक भाऊ निकाळजे यांचा भव्य मोठा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय सोमर्डी येथील सर्व रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप केले तसेच शालेय साहित्य वाटप करत एक आगळावेगळा अनोखा वाढदिवस दीपक भाऊ निकाळजें यांचा साजरा केला.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे जिल्हा सचिव आयु. किरण बगाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम,तालुकाध्यक्ष अमित साळुंखे उपाध्यक्ष सयाजी भिसे तालुका सचिव दिगंबर कांबळे राम गायकवाड अभिजीत भोसले पत्रकार इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!