सामाजिक

सुधारित‘अभिव्यक्ती मताची’ जाहिरात स्पर्धाआयोजीत

सातारा दि. 3, (जि.मा.का.) – विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे “अभिव्यवती मताची” या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भितीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.
                            या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नालिजम) महाविद्यालये आणि सर्जनशिल कलाशिक्षण महाविद्यालय (ART COLLEGES) यातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी 01 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. विषय आणि नियमावली “मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र” या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
                      युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकार लोकशाहीचा स्तंभ, एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदारांची भूमिका,जबाबदारी,लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकार असे विषय स्पर्धेसाठी आहेत. या तीन ही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धेसाठी 1 लाख रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशिल कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी भाग घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!