
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
कुसुंबी. दि.०९. जावली तालुक्यातील तहसिल कार्यालयात महसूल दिनानिमित आयोजित कार्यक्रमात महसूल विभागातील कार्यरत असलेले दरे खुर्द सजाचे तलाठी श्री धर्मा आंबवणे यांच्या कामकाजाची प्रशासनाने दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट तलाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
धर्मा आंबवणे हे भिमाशंकर (जि. पुणे ) येथील असून ते महसूल विभागामध्ये डिसेंबर २०१५ पासून तलाठी या पदावर कार्यरत असून त्यांनी जावली तालुक्यातील कुसूंबी गांजे दरे आलेवाडी म्हाते बु. मोहाट सावली आनेवाडी सायगाव कुडाळ या सजातील गावामध्ये काम केले आहे.
अगदी आपल्या कमी वयातच प्रशासनात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. सन 2022-2023 या महसूली वर्षात त्यांनी उल्लेखनीय काम केले. शासकीय वसूली, निवडणूक शासन आपल्या दारी, नैसर्गिक आपत्कीन परिस्थितीत केलेले काम तसेच इतर शासकीय केलेल्या कामकाजाची प्रशासनाने दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट तलाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
नुकत्याच झालेल्या महसूल दिनानिमित उत्कृष्ट महसूल कर्मचारी म्हणून त्यांना सातारा जावळीचे प्रांताधिकारी श्री दादासाहेब दराडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी जावळीचे तहसिलदार श्री.हणमंत कोळेकर साहेब. नायब तहसीलदार शोभा भालेकर मॅडम. नायब तहसीलदार श्री संजय बैलकर साहेब आदी उपस्थित होते.
महसूल विभागाकडून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येते. प्रमाणपत्र शाल व श्रीफळ अस त्याच स्वरूप आहे. प्रशासनाने केलेल्या या सत्कारामुळे काम करण्यास एक वेगळी ऊर्जा प्रात होते व अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास आणखी प्रेरणा मिळते असे यावेळी श्री धर्मा आंबवणे यांनी सांगितले. या सन्मानामुळे जावळीतील जनतेकडुन श्री. आंबवणे यांचे सर्व स्तरावरून कौतूक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या सन्मानामुळे त्याचे श्री राम कदम – युवा नेते मा. चेअरमन खादी ग्रामोद्योग संस्था मेढा , श्री. एकनाथ सूतार पोलीस पाटील कुसूंबी,श्री संजय वांगडे कुसूंबी आदीनी अभिनंदन केले