स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा, ता. जावळी येथील तहसील कार्यालयात महसूलदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल विभागातील कार्यरत असलेले उपलेखापाल प्रशांत सयाजीराव शिंदे यांना उत्कृष्ठ कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले.
उपलेखापाल प्रशांत शिंदे यांनी जावली तालुक्यातील सन 2022-23 वर्षांमध्ये महसूल विभागामध्ये उल्लेखनिय कामकाज केलेबाबत महसूल दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे व तहसीलदार हणमंत कोळेकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला, मागील वर्षी पुरवठा विभाग ISO करण्यामध्ये महत्वपुर्ण कामगिरी केलेबाबत मा विभागीय आयुक्त पुणे यांचे प्रशस्तीपत्र देऊनही सत्कार करण्यात आला होता .तसेच इतर शासकीय केलेल्या कामकांजाची प्रशासनाने दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट कर्मचारी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले .
नुकत्याच झालेल्या महसूल दिनानिमित्त उत्कृष्ठ कर्मचारी महसूल म्हणून त्यांना प्रांताधिकारी दादासाहेब दराडे ,तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार शोभा भालेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर आदी उपस्थित होते. महसूल विभागाकडून दर वर्षी उत्कृष्ष्ठ कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून गौरविण्यात येते. प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.