स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-( प्रतिनिधी मोहन जगताप यांजकडून )
सातारा.दि.१०. ३५० वा राज्याभिषेक” निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि महाराजांच्या पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विषेश बोधचिन्हाचे आज वरणे ता सातारा ग्रामपंचायत कार्यालयात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना सरपंच रमेश पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा, जगभरात जेथे जेथे मराठी माणूस आहे तेथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तसेच त्यांच्याबद्दलची माहिती पोहचावी हा या मागील उद्देश.याअनुषंगाने,राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या प्रचार/प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्रव्यवहार तसेच बोधचिन्हाचा वापर करण्यासाठी शासन आग्रही आहे.
शासनाशी आम्ही ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामस्थांनी व प्रशासनातील ग्रामसेवक व गावकरी एकजुटीने कटिबद्ध असून जिल्ह्या बरोबरच देशात छत्रपतींच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी अनिल कंठे यांनी केले .या बोध चिन्हाचे अनावरण प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिता यादव, अशा पवार, रजत भसमे, सुनंदा पवार. विजयकुमार पवार, सुषमा कालंगे,शहाजी काळंगे, शहाजी काळगे, सुनीता सुतार, उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे कुसुम पवार यांनी आभार मानले.