स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
कुसुंबी.दि .१०. नाचणीचे गाव कुसुंबी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील एकनाथ सुतार यांचा एस.पी कार्यालयाकडून सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी त्यांचा प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात आला.दक्षिण जावळीतील राजकीय द्रष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कुसुंबी गावामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रशासन मोठ्या शिताफीने हाताळण्यात यशस्वी ठरलेले.ज्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याबद्दल मागील दोन वर्षांपूर्वी जावली तालुक्यातील आदर्श पोलिस पाटील पूरस्कार पटकावणारे,कुसुंबी पंचक्रोशीतील बारा वाड्यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योगदान देत असल्याबद्दल त्यांची जिल्हा एस पी श्री समीर शेख यांनी या वर्षी खास दखल घेऊन जावळी तालुक्यातील सर्जापूर चे पोलीस पाटील ज्ञानेश्वर नारायण बोराटे व कुसुंबी चे पोलीस पाटील एकनाथ आनंदराव सुतार या दोन गावचे पोलीस पाटील निवडले त्यामध्ये दोघाना हा मानाचा पुरस्कार मिळाला .
पोलीस पाटील एकनाथ सुतार यांना 2011 पासून एपीआय राजेश नाईक साहेब, एपीआय कटाळे साहेब, एपीआय समाधान चौरे साहेब,एपीआय जीवन माने, एपीआय नीलकंठ राठोड, एपीआय काळे साहेब, एपीआय अमोल माने तसेच एपीआय संतोष तासगावकर साहेब व मेढा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. एकनाथ सुतार यांना डीवायएसपी खराडे मॅडम यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला होता.
श्री एकनाथ सुतार यांनी या गौरव प्रशंसापत्राबद्दल मनोगत व्यक्त करताना हा सन्मान भेटण्यामागे आई वडील,कुटुंबातील इतर सदस्य व गावकऱ्यांकडून मिळत असलेल्या योग्य सहकार्यामुळे हे शक्य झाले आणि हा सन्मान माझा नसून समस्त कुसुंबीकरांचा आहे आहे असे सांगितले.त्यांच्या या कार्याबद्दल समस्त जावली तालुक्यातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे . हा सन्मान घेतल्यावर कुसुंबी चे लोकनियुक्त सरपंच मारुती चिकणे तसेच ग्रामस्थ मंडळ कुसुंबी, नेहरू युवा मंडळ कुसुंबी युवा नेते साधू चिकने, राम कदम यांनी पोलीस पाटील एकनाथ सुतार यांचे अभिनंदन केले.