स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा दि. 11 : भारतीय डाक विभागाच्यावतीने डिजीटल इंडिया फॉर न्यु इंडिया या विषयावर अखिल भारतीय पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन सातारा विभागाचे प्रवर डाक अधिक्षक विलास घुले यांनी केले आहे.
ढाई आखर पत्र लेखन स्पर्धा 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपले पत्र पाकिट बंद करुन 31 ऑक्टोंबरपर्यंत चिफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई-400001 यांच्या नावे जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा जवळच्या पत्रपेटीत टाकावे. अधिक माहितीसाठी 02162-237437/237443 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.