स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा. दि .१२. वाठार पोलिसांनी चोरीस गेलेल्या सात तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा 24 तासात उघड करून एकास ताब्यात घेतले आहे. संबंधिताकडून 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील कवडेवाडी येथील सौ. उषा आनंदराव जगदाळे यांची सासू दि. 9 ऑगस्ट रोजी मयत झाल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जगदाळे या रात्री एक वाजण्याच्या सुमारास सातारा येथून कवडेवाडी येथे रिक्षाने आल्या होत्या. त्यावेळी अंत्यविधीसाठी जाताना त्यांनी त्यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्या मालकीच्या रिक्षाच्या सीट खाली पर्समध्ये ठेवून त्या अंत्यविधीसाठी गेल्या. अंत्यविधी करून परत आल्यानंतर त्यांचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी वाठार पोलीस स्टेशनला याबाबतची फिर्याद दाखल केली होती.