स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
तापोळा. दि .१५ .वस्तीशाळा शिक्षक यांची मूळ नियुक्ती पासून सेवा ग्राह्य धरावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची शिक्षक भारती शिक्षक संघटना सातारा या संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षक यांनी भेट घेऊन निवेदन दिले.
सर्व शिक्षा अभियान २०२१ साली वस्तीशाळा योजना सुरू झाली वस्तीशाळा शिक्षक यांनी स्वयंसेवक आणि निमशिक्षक या पदावर 14 वर्ष अतिअल्प मानधनावर 14 वर्ष सेवा केली.2014 साली वस्तीशाळा शिक्षक यांची नियमित उपशिक्षक पदावर नियुक्ती आदेश झाला.मात्र 14वर्षे अतिअल्प मानधनावर सेवा बजावून मूळ नियुक्ती दिनांकापासून सेवा ग्राह्य धरण्यात आली नाही.मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी हा विषय समजून घेऊन शिक्षणमंत्री महोदय,शिक्षक सचिव यांच्या समवेत मुंबई येथे बैठक घेऊन आपला विषय निकाली काढला जाईल असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्यासाठी श्री शंकर भोसले,श्री संजय संकपाळ,श्री विजय भोसले,श्री संतोष कदम,श्री गणेश कदम,श्री संतोष शेलार,श्री हरिश्चंद्र कदम,श्री आनंद जाधव,श्री तानाजी आगुंडे हे शिक्षक बांधव उपस्थित होते.