
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा. दि. १५. 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन,मातृभूमीच्या व आपले जडण -घडण झालेल्या ज्ञानमंदिराच्या कर्तव्यभावनेपोटी,म्हाते बु!!प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी ,वागदरे गावचे सुपुत्र, नवतरुण विकास मंडळ, वागदरे गावचे मा.अध्यक्ष आपल्या अध्यक्ष पदाच्या कालावधीत युवकांना व ग्रामस्थांना एकत्रित विचाराने संघटित करून वागदरे गावाला विकासाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवणारे,पंचक्रोशीचे आधारस्तंभ,मार्गदर्शक मा.श्री. शंकर विठ्ठल शेलार( बापु )यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनी अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयातील तसेच प्राथमिक शाळेतील गरजु विध्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतासह देशभक्तीपर गीते सादर केली,बापूंनी अनेकदा पंचक्रोशीतील सामाजिक उपक्रमांना नेहमी हातभार लावला आहे.बापूंचे मातृभूमीच्या व ज्ञानमंदिराच्या कर्तव्यभावनेपोटी केलेल्या दातृत्वभावनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी प्रामुख्याने दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य कर्मचारी,म्हाते बु!!गावचे सरपंच किसनराव कांबळे,उपसरपंच -अशोकराव सपकाळ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील -सुरज कांबळे,मा. सरपंच व जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक -हनुमंतराव शिंगटे,मेढा सोयासायटीचे मा.संचालक राजाराम गोगावले,मा.उपरसरपंच -धोंडीराम बुवा सपकाळ,दत्तात्रय बुवा सपकाळ,बजरंग दळवी,संपतराव रा. सपकाळ,ज्ञानदेव शेलार,विष्णु सपकाळ,सयाजीराव कांबळे,पांडुरंग महाराज सपकाळ,हरिभाऊ सपकाळ,राजकुमार सपकाळ,संतोष सपकाळ,संदीप सपकाळ,संदीप साळुंखे,वैभव सपकाळ,चंद्रकांत सपकाळ,अक्षय गोगावले,निलेश सपकाळ,शांताराम सपकाळ,अक्षय सपकाळ,एकनाथ सावले,संतोष गोगावले,आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्वाना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले तद्नंतर सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला.