सामाजिक

छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट,हिंदुत्ववादी संघटनांनी रोखला सातारा पंढरपूर महामार्ग

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——

सातारा दि.१८.        समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा प्रकार सातारा शहर परिसरात घडला . हा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना तसेच शिवभक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच कार्यालयाच्या दारात जय श्रीरामाच्या घोषणा देत कार्यालय परिसर दणाणून सोडला हजारो युवकांनी गुरुवारी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले यामुळे येथील वाहतुकीची सुमारे तासभर कोंडी झाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत सकाळी साडेदहाच्या सुमारास शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी तत्काळ थांबवावी व आपत्तीजनक पोस्ट करणाऱ्या युवकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच काही लोकांनी प्रशासनास निवेदन दिले.

शिवरायांबद्दल समाज माध्यमातून केली जाणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यानच्या काळात शेकडो युवक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जमले आणि त्यांनी सातारा पंढरपूर महामार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच रस्त्यावर बसकण मारली संबंधितांवर कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका घेतली.यामुळे पोवई नाका परिसरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडला सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सातारा तालुका पोलीस स्टेशनचे विश्वजीत घोडके तसेच मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला . त्यांनी आंदोलकांची समजूत काढली संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर पुन्हा दणाणला पोलिसांनी युवकांना आश्वासित करत शांतता राखण्याच्या आवाहन केले.

मात्र आंदोलनाच्या सुरुवातीला कोणताच पोलीस यंत्रणाच आंदोलनस्थळी उपस्थित नव्हती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या समोरच जय श्रीराम च्या घोषणा सुरू होत्या तेव्हा हाताच्या बोटावर मोजण्याचे पोलीस लांबूनच आंदोलनाचा नजारा बघत होते खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार लावून घेण्यात आले होते .

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!