स्टार ११ महाराष्ट्र न्युज —–
मेढा.दि.२४. मेढा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास जावली तालुका पत्रकार संघ व डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी रक्तदान शिबीरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासाण्याचे काम केले असल्याचे मत मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी सतोष तासगावकर म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी पडणारे जीवदान आहे. त्यामुळे रक्तदानाच्या माध्यमातून पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. तसेच पोलीस पाटलांनी सुध्दा या कार्यात चांगले योगदान देऊन देशसेवेचे वृत जोपासले आहे.
यावेळी डिजिटल मिडीयाचे जिल्हा सचिव सोमनाथ साखरे, मिडीया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष भास्कर धनावडे, सचिव सुनिल धनावडे, कार्याध्यक्ष युवराज धुमाळ, पत्रकार देवा साळुंखे, पत्रकार बजरंग चौधरी, पत्रकार संजय वांगडे, पत्रकार रघूनाथ पार्टे तसेच अक्षय रक्तपेढी सातारचे संदीप सकटे, डॉक्टर पूजा शिंदे, अतुल साळुंखे, टेक्निशियन ज्योती शिंदे,स्टाफ नर्स पायल पवार व संकेत भोसले, आयुष पवार दिव्या साबळे व अक्षय गुजर यांनी रक्तदान शिबिराचे कामामध्ये सहकार्य केले.