
स्टार ११ महाराष्ट्र न्युज – युवराज धुमाळ
नवीमुंबई.दि.२७. जावली तालुक्यातील मुंबईस्तिथ अधिकाधिक जावलीकरांना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने कंबर कसली आहे.गेल्या काही वर्षांपासून मुंबईस्तिथ जावली तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून मेळावे, शिबिरांचे आयोजन करून अनेक तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज रविवार दि.२७ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता कोपर खैरणे येथे जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कै.आण्णासाहेब पाटील स्मृति भवन, सेक्टर ०५ कोपरखैरणे, नवीमुंबई -४००७०९ येथे मुंबईस्थित जावलीकरांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे मा.जलसंपदा मंत्री / विधान परिषद सदस्य आ.शशिकांतजी शिंदे, सातारा जावली विधानसभा मतदार संघ दिपक साहेबराव पवार, युवा उद्योजक राजेंद्र धनावडे,अध्यक्ष सातारा जावली विधानसभा मतदार संघ शशिकांत वायकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जावली तालुका भानुदास भोसले, युवा नेते राष्ट्रवादी सुनील नाना देशमुख,कोपरखैरणे तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे,जावली तालुका उपाध्यक्ष बाजीराव धनावडे युवा नेतृत्व जावली सचिनदादा सावले, समाधान ओंबळे, उपस्थित राहणार आहेत.
समस्त मुंबईस्थित जावलीकरांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी जावली तालुका राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.