स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——
मेढा दि.२७. सातारा जिल्ह्याला छत्रपतीं शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिने जगाला दिलेल्या आचरणातून आज ही भूमि नव्हे तर देश समृद्धीकडे गेला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातुन साताऱ्यातील अनेक गावे देश पातळीवर झळकली त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर पाहिल्या सर्वेक्षणसाठी क वर्ग दर्जाच्या आगारातील मेढा आगार हे राज्यात प्रथम आले त्याबद्दल जावलीसह जिल्ह्यातील सर्वसामान्यांना त्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांनी मोहाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आयोजित आगार प्रमुख नीता बाबर पवार यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
गटविकास अधिकारी मनोज भोसले म्हणाले की जावळीतून राज्याचा नकाशावर नाव कोरलेल्या मेढा आगारात सामाजिक जाणिवेतून मदतीचा हात देवून मेढा आगर राज्यात नव्हे तर देशात अवलस्थान मिळण्यास सर्वसामान्य जनतेने पुढे येवून सहकार्य करण्याची गरजच आहे.
यावेळी सरपंच विलास धनावडे यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमासह वीरजवान पत्नी माता पिता यांच्या सत्कार प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान गावातील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी पदाधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या विकास कामाच्या संदर्भात या वेली चर्चा करण्यात आली. कृष्णा धनावडे यांनी आभार मानले