सातारा पोलिस दलाची जागा हस्तांतरित न करणेची पोलिस बॉईज ची मागणी
जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर.

स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
सातारा दि ३० ( प्रतिनिधी )मौजे. म्हसवे तालुका सातारा येथे सातारा जिल्हा पोलीस दलाची १०५ एकर जागा आहे सदर जागे मध्ये काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून म्हसवे येथे विविध प्रकारची वृक्ष लागवड केले आहेत परंतु सदर जागा हि पोलीस विभागाचे मूळ मालकीची असून या जागेमध्ये विविध पोलीस उपयोगी प्रकल्प राबवावे . ही जागा कोणालाही हस्तांतरित केली जाऊ नये अशी मागणी पोलीस बॉईजच्या वतीने करण्यात आली . महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात नमूद आहे की गृह विभाग, जिल्हा पोलीस दल, पोलीस कल्याण निधी इत्यादी सरकारी यंत्रनेच्या माध्यमांतून आगामी काळात पोलीस दला साठी व पोलीस कुटुंबीयासाठी विविध प्रकारच्या योजना जसे कि पोलीस निवासस्थाने, पोलीस क्रीडा संकुल,शैक्षणिक संकुल इत्यादी उपक्रम म्हसवे येथील पोलीस दलाच्या विस्तीर्ण जागेत राबविले जाऊ शकतात परंतु सदर जागा हि कोणत्याही समाजसेवी संस्थेस अथवा खाजगी व्यक्तीस हस्तांतरित केलेस सातारा जिल्हा पोलीस दलाचे व पोलीस परिवाराचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे तरी सदर जागा कोणत्याही व्यक्तीस अथवा समाजसेवी संस्थेस हस्तांतरित करू नये .
तसेच आगामी काळात पोलीस दलाची जागा इतर कोणास हि देणेचा प्रयत्न झालेस पोलीस कुटुंबियांकडून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणेत येणार असलेच सांगितले यावेळी किरण खरात , रोहित सोनावणे , राहुल उनके आदी पोलीस बॉईज व पोलीस कुटुंबीय उपस्थित होते