
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ———-
सातारा दिनांक 30.खंडाळा गावाच्या हद्दीत गणपती मंदिराचे कुलूप तोडून अज्ञाताने स्टेनलेस स्टीलची दानपेटी आणि त्यातील रोख रक्कम असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेची फिर्याद जितेंद्र श्रीराम गाढवे व 38 राहणार खंडाळा यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
ही घटना 27 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते 28 ऑगस्ट सकाळी पाच या दरम्यान घडल्याची माहिती आहे वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस भालचिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली याबाबतचे अधिक माहिती अशी चोरट्याने गणपती मंदिराचे सभा मंडप तोडून आज प्रवेश केला मंदिराच्या परिसरात पाच हजार रुपये किमतीची स्टेनलेस स्टीलची दानपेटी आणि त्या दानपेटीतील भाविकांनी दान म्हणून टाकलेले 50 हजार रुपये असा 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला पोलीस हवालदार एसजी पोळ अधिक तपास करत आहेत.