स्टार ११ महाराष्ट्र न्युज —— युवराज धुमाळ
मेढा.दि. ०२. कोणत्याही प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी हे आपल्या मायभूमितील सर्वसामान्य लोकांच्या तक्रार निवारणासाठी कायम कटिबद्ध असतात त्यांची काम करण्याची हातोटी वेगळी आहे.सर्वसामान्य लोकांची कामे पटकन करून देतात.अश्या अधिकाऱ्याच्या खऱ्या कार्याचा उल्लेख शब्दात व्यक्त करता येत नाही असाच एक अधिकारी मुळ जावली तालुक्यातील काळोशी गावाचे रहिवाशी व महसूल विभागातील जेष्ठ अधिकारी संजय बैलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बोंडारवाडी धरण कृती समिती व जावली तालुक्यातील विविध मान्यवर तसेच सरपंच परिषदेच्या माध्यामातून संयुक्त कार्यक्रमाचे आज मेढा येथे आयोजन करण्यात आले होते.
जावली तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर म्हणाले की जन्म भूमितील अधिकाऱ्यांना व्यथा वेदनांची जाणीव असलेले सर्वच प्रशासकीय अधिकारी जातील त्या ठिकाणी स्वताच्या प्रश्नांची उत्तरातून सामाजिक भान व समाजाभिमुख प्रशासन देण्यासाठी कायम तत्पर्य असून ग्रामीण भागातील सर्व अधिकारी हे सामाजिक भूमिकेतून योग्य न्याय देण्याचे काम करीत असतात.संविधानानाने दिलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसार सर्वाना न्याय देण्याचे काम करीत असले तरी कामाच्या निपटारा करताना झटपट न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी हे कार्यतत्पर्य दाखविल्यास त्यांना समाजाभिमुख अधिकारी म्हणून समाज मान्यता मिळते असे या कार्यक्रमच्यावेळी नमूद केले.
कार्यक्रमच्या सुरवातीला वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर मामुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना खाऊ वाटप करण्यात आला.आपल्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल व प्रेमरूपी शुभेच्या देण्यासाठी उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे महसूल अधिकारी संजयजी बैलकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमच्या वेळी वेळी नायब तहसीलदार सुनील मुनाळे बोंडारवाडी कृती समितीच्या वतीने आदिनाथ ओंबळे,श्रीरंग बैलकर,राजेंद्र गाडवे,बाजीराव चिकणे,शंकर खामकर,जावली पत्रकार संघाचे वतीने जेष्ठ पत्रकार मोहनराव जगताप, बजरंग चौधरी.सुनील धनावडे युवराज धुमाळ आटवेआप्पा.व सतीश साळुंखे,भणंग गावाचे सरपंच गणेश जगताप उपस्थित होते.