
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी —–
सातारा. दि . ०२ . मोबाईल चोरी प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान शाहूनगर गोडोली येथील एका महिलेचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी स्वप्निल अंकुश पोतेकर रा. शेंद्रे तालुका सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करीत आहेत.