स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——–
पाचगणी.दि.०३. जावली तालुक्याचे मुख्य ठीकाण म्हणुन ओळख असलेल्या मेढा शहरातील .मुस्लीम समाजाच्या मशिदीच्या रस्त्याचा रखडत पडलेला प्रश्न सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्गी लावला असल्याने .आ शिंवेद्रराजे भोसले यांनी रस्त्याच्या प्रश्नाबाबत भुमीका घेत मुस्लीम समाजाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे मुस्लीम समाजाकडुन याबाबत त्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे .
गत १० वर्षाहुन अधिक काळ मेढा येथील जामा मशिदीच्या रस्त्याचा प्रश्न भिजत घोगंड होवुन पडला होता .प्रशासकीय कागदोपत्री अडकुन पडलेल्या प्रश्नाबाबत मेढा मुस्लीम समाजातील युवकांनी आ शिंवेद्रराजेना मशिदीच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत अडचणी निर्माण झाल्या असल्याचे निदर्शनास आणले . याबाबत आ शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासकीय अधिका-याची चर्चा करत .मशिदीच्या रस्त्याबाबत येणा-या सर्व अडथळे दुर करुन मेढा मशिदीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला .
आ शिंवेद्रराजे भोसले यांनी मशिदीच्या सोडवलेल्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत पत्रकार सादिक सय्यद , सादिकभाई मुजावर,मुन्नाभाई अत्तार , बादशाभाई आत्तार , नासिरभाई शेख , युसुफभाई पठाण , सादिक पठाण , सत्तार पठाण , मुसाभाई शेख , इम्रान आत्तार, चांद शेख , छोटु शेख , अतिक खान , शाहरुख खान समिर भाई अत्तार आदिनी आमदारांचे आभार मानले .