जिल्ह्यात पोलिसांनी सतर्क रहावे,कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घ्या
- पालकमंत्री शंभूराज देसाई
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——–
सातारा दि.26 : जालना येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलाने सतर्क राहावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, समाज माध्यमांमधून अफवा पसरवल्या जातात त्यावर विशेष लक्ष ठेवावे. समाजामध्ये शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहचवावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.
00000