
स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-
सातारा, दि.7. बांबू लागवड कार्यक्रामाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था सदस्य व माजी अध्यक्ष कृषि मूल्य आयोग पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

11 सप्टेंबर रोजी जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यासाठी दुपारी 2 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा, 12 सप्टेंबर रोजी खंडाळा, वाई व महाबळेश्वर तालुक्यासाठी सकाळी 10 वाजता पंचायत समिती वाई, 12 सप्टेंबर रोजी कराड व पाटण तालुक्यासाठी दुपारी 2 वाजता टाऊन हॉल, कराड, 13 सप्टेंबर रोजी माण व खटाव तालुक्यासाठी सकाळी 10 वाजता स्वाती मंगल कार्यालय, दहिवडी व 13 सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यासाठी दुपारी 2 वाजता पंचायत समिती फलटण येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि), ग्रामसेवक, विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी या एक दिवशीय कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.