महाराष्ट्रसामाजिक

गोगलगाय बनून जगाल तर चिरडून जाल, क्रांतीकारकांसारखे जगाल तर स्मरणात रहाल

- बंडातात्या कराडकर

 

स्टार ११ महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी ——-

सातारा.दि.१०.    व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र,सातारा तालुका आयोजित एक दिवशीय तालुकास्तरीय संस्कार शिबिर शाहूपुरी येथील फाशीचा वड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी बोलताना युवकमित्र बंडातात्या कराडकर म्हणाले क्रांतीकारकारकांनी दिलेले बलिदान विसरू नका कारण त्यांच्या बलिदानातूनच जगण्याची प्रेरणा मिळत असते.

व्यसनमुक्त युवक संघाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने राज्यभर मेळावे आयोजित करून साजरे केले जात असून सातारा तालुक्यातील हा उपक्रम क्रांतीचा जाज्वल्य इतिहास ज्या ठिकाणी घडला अश्या शाहूपुरी येथील फाशिचा वड या ठिकाणी संपन्न झाला. दिवसभर चालू असलेल्या कार्यक्रमात सकाळच्या पहिल्या सत्रात क्रांतिकारकांच्या स्मारकास आभिवादन करण्यात आले. या वेळी या स्मारकाचे पूजन संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजी नावडकर,श्री शरद रायते व संघटनेचे अध्यक्ष दिपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर या परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर याच ठिकाणी असणाऱ्या क्रांती सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी व्यर्थ न हो बलिदान या विषयावर माजी उपअभियंता व संघटनेचे मार्गदर्शक श्री प्रमोद भापकर यांनी आपले विचार व्यक्त केले.या वेळी बोलताना श्री प्रमोद भापकर यांनी १८५७ पासून झालेल्या क्रांतीची बीजे कश्या पद्धतीने महाराष्ट्रात रुजली गेली याचे अनेक उदाहरणांसह स्पष्टीकरण केले. या वेळी शालेय जीवनातील नंदुरबार चे शालेय विद्यार्थी हुतात्मा शिरीषकुमार ते क्रांतिसिंह भगतसिंह,राजगुरू, सुखदेव यांच्या त्यागाच्या बलिदानाची जाणीव आपण कशी ठेवावी हे सांगितले.या वेळी दुपारच्या सत्रात संघटनेचे मार्गदर्शक श्री बाळासाहेब निकम व विलासबाबा जवळ यांनी संघटनेच्या पंचवीस वर्षातील वाटचालीची कार्य पूर्ती उपस्थितांना विशद केली.

शेवटच्या सत्रात संघटनेचे संस्थापक गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांनी देशाप्रती असलेली आत्मीयता कशी असावी हे सांगताना गोगलगाय बनून जगाल तर चिरडून जाल छत्रपती श्री शंभूसारखे छावा बनून संघर्ष कराल तर सदैव स्मरणात रहाल. प्रत्येक युवकांनी निर्व्यसनी राहून बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपला सहभाग वाढवावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला तुषार जगताप, राजेंद्र आडसुळे, सचिव योगेश जाधव, कोल्हापूरजिल्हा अध्यक्ष श्री संदीप पाटील,जगन्नाथ शिंदे,संजय अहिरेकर, रणजीत कदम,वाई तालुका अध्यक्ष आनंदराव कदम, सातारा तालुका अध्यक्ष श्री विराज वाघमळे सुरेश कदम,विजय कदम, राजेंद्र चव्हाण इ.शेकडो युवक उपस्थित होते.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!