
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
केळघर. दि.०५.पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर पडत असताना सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा गुलालाचा धुराळा उडणार असून,ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या निवडणुकीसाठी आज जावली तालुक्यात विविध ठिकाणी मतदान पार पडले.
जावली तालुक्यातीलआज ०६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी कुरळोशी,भामघर,वागदरे,बिभवी,सांगवी तर्फ मेढा,आनेवाडी येथील एकूण सरपंच पदासाठी ०५ उमेदवार व सदस्य पदासाठी एकूण २० उमेदवारांची चुरशीची लढत होती.या लढती साठी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करत आपआपली पक्षाची ताकत लावत सरपंचांसह सदस्य निवडून आनण्यासाठी प्रयत्न केले.निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रियाआज शांततेत पार पडली. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती तर, दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी मतदानाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून येत होता, संध्याकाळ पर्यंत मतदारांनी येऊन आपला हक्क बजावला.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी तसेच मतदानावर परिणाम होवू नये,यासाठी जावलीचे तहसीलदार हनमंत कोळेकर व सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तालुक्यातील एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता जावली तालुक्याच्या जनतेचे उद्या होणाऱ्या ६ ग्रामपंचायतीच्या मत पेटीतील निकालाकडे लक्ष वेधलेआहे.