
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
महाबळेश्वर.दि.०५.महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वरच्या बाजारपेठेत तब्बल 40 हजार रूपये आणि 2 तोळे सोने असलेली पर्स,महाबळेश्वर मधील नागरिक सचिन नामदेव गुजर यांना सापडली.एवढी रक्कम पर्स मध्ये असताना मनात कोणतीही पैशाची लालच न बाळगता या व्यक्तीने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात जमा केली.
पर्स हरवल्याची नोंद आज सकाळी 11.30 वाजता सौ.सुरेखा नथुराम कांबळे रा.महाड ता.रायगड यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात केली होती.हि सदर हरवलेल्या पर्सचा तपास कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार अमोल पवार,व पोलिस कॉन्स्टेबल सचिन जांभळे यांच्याकडे होता.पर्सचा शोध घेत असताना महाबळेश्वर मधील नागरिक सचिन नामदेव गुजर यांना ती पर्स मिळाल्याने त्यांनी ती पर्स महाबळेश्वर पोलिस ठाण्यात जमा केली.हवालदार अमोल पवार यांनी सौ.सुरेखा कांबळे यांना संपर्क करून पोलिस ठाण्यात बोलावून ती पर्स त्यांची आहे का खात्री करून सौ सुरेखा कांबळे यांच्या कडे सुपूर्त केली.सुरेखा कांबळे यांनी आणि त्यांच्या परिवाराने सचिन गुजर व महाबळेश्वर पोलिसांचेआभार मानले.