स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——–
मेढा,दि.०८. जावळी तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी सामाजिक संस्था मित्रमेळा फाऊंडेशन जावली यांच्यावतीने सन २०२३ साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मान्यवरांना जावली गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देवून सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे सावली ता. जावळी गावचे सुपुत्र नामदेव आनंदा जुनघरे गुरुजी यांना त्यांच्या ३१ वर्षाच्या शिक्षक सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ यांच्या हस्ते देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
जावळी शिष्यवृत्ती पॅटर्नच्या यशस्वीतेमध्ये नामदेव जुनघरे गुरुजींचा सिंहाचा वाटा असून त्यांचे शेकडो पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक तसेच नवोदय व विविध स्पर्धेत यशवंत झाले आहेत .सदाशिव सपकाळ म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील अतिशय योग्य व्यक्तिमत्व नामदेव गुरुजींना जावळी पुरस्कार देवून आपण पुरस्काराची उंचीच वाढवली आहे . विविध क्षेत्रातील अचूक व्यक्तींचा हा सन्मान सोहळा निश्चित कौतुकास्पद आहे .यावेळी समाजसेवक एकनाथ ओंबळे, विजय निकम, चंद्रकांत कांबिरे, विशाल बांदल व काजल गोसावी, श्री महिगांवकर आदींनी या कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
नामदेव जुनघरे गुरुजी नी यावेळी माझ्या कार्याची दखल घेवून आपण दिलेला घरचा पुरस्कार माझ्यासाठी लाख मोलाचा असून मी आपला सदैव ऋणी राहीन, हा सन्मान माझा नसून माझे आई -वडील, पत्नी कुटुंब, माझे गुरुवर्य आणि सावली गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .या पुरस्काराबदल नामदेव जुनघरे यांचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी उपाध्यक्ष जि प सातारा वसंतराव मानकुमरे, डी सी सी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेसावली गावचे सरपंच विजय सपकाळ, उपसरपंच बाबूराव भिलारे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, चंद्रकांत कर्णे केद्रप्रमुख अलका संकपाळ,विजय देशमुख, मा. अरविंद दळवी, हंबीरराव जगतापसर्व सावली ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, उपाध्यक्ष सुशांत जुनघरे पोलीस पाटील संजय कांबळे, ज्येष्ठ शिक्षक आनंदराव म्हस्कर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतू म्हस्कर गुरुजी, पाणलोट समितीचे अध्यक्ष पांडुरंग जुनघरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक प्रशांत जुनघरे व समस्त सावली व मांटी ग्रामस्थ , समस्त शिक्षक वर्ग जावली तालुका यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले .
मित्रमेळा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार व सचिव निलेश धनावडे यांनी स्वागत केले. उपाध्याक्ष अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले . खजिनदार दत्तात्रय सपकाळ नियोजन केले . तर संचालक अमित लकेरी यांनी आभार मानले.
सामाजिक संस्था मित्रमेळा फाऊंडेशन जावली यांच्यावतीने सन २०२३ साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मान्यवरांना जावली गौरव पुरस्काराने सन्मानित