स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——- प्रतिनिधी —–
सातारा दि. ०८.दिपावली उत्सव दिनांक 11 नोव्हेंबर 2023 पासुन सुरु होत असुन दिपावलीमध्ये नागरिक मोठया प्रमाणात फटाक्यांची खरेदी करतात. सातारा शहरात व तालुक्यात तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी तहसिल कार्यालय सातारा यांच्या मार्फत परवाना दिला जातो.
तथापि काही ठिकाणी विनापरवाना फटाका स्टॉल उभारणी केलेचे निर्दशनास येत असून सदर विनापरवाना फटाका स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत फटाका स्टॉलवर कारवाई करण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी यांना आदेश देणेत आलेले आहेत.
तात्पुरता फटाका स्टॉल सुरु करु इच्छिणाऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे सादर करुन परवाने घ्यावे, असे आवाहन सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी केले आहे. तसेच परवानाधारक फटाका स्टॉलवर काही अनुचित प्रकार घडणार नाहीत याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवुन सर्व अटी व शर्तींचे पालन परवानाधारक यांनी करावे. आगामी दिपावली सणासाठी नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी व दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी ,असे आवाहनही त्यांनी केले आहे.