स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– विद्या युवराज धुमाळ
मेढा.दि.१८. सकल मराठा समाज जावली तालुक्याच्या वतीने आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा येथे पार पडली.
राज्यभरातील मराठा समाज एकवटलेला असून मराठा आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आपण दूरदृष्टी ठेवून सावधानी बाळगायला हवी तरच मराठा जात वाचेल.मराठा समाज ओबीसीत नाही असे नाही याकरिता आरक्षण नेमके काय आहे समजून घ्यायला हवे.जीवनात पाण्याइतकेच आरक्षण गरजेचे झाले असून,आज जाती-जातीत दंगली घडवण्याची भाषा केली जाते. परंतु, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.मी दिसायला बारीक असलो तरी माझ्या टप्प्यात आला की वाजवतोच, असा टोलाही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला.
ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यात कोणतीही तेढ निर्माण होवू द्यायची नाही, या राज्यात कायदा व सुव्यवस्था कोणीही मोडायचा नसून राज्यात शांतता राहिली पाहिजे, ही जबाबदारी मराठ्यांनो, तुमच्या खांद्यावर आहे. मराठे आरक्षणात गेले हे लक्षात आल्यानेच जातीय दंगली घडतील,अशी वक्तव्ये करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव असल्याचे जरांगे-पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी सकल मराठा समाज जावली यांच्या वतीने सातारा शहराकडून येणाऱ्या व कुडाळ,करहर मार्गे येणाऱ्या त्याचप्रमाणे कुसूंबी व केळघर मार्गे येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची जागोजागी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.सकल मराठा समाजाच्या वतीने १०० हून अधिक स्वयंसेवकांची नेमणूक या सभेसाठी करण्यात आलेले होती.
या कार्यक्रमास जावली तालुक्यासह पुणे व मुंबई येथून हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला या कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी एक लाख एक मराठा जय भवानी जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे या घोषणांमुळे सर्व परिसर दुमदुमला होता.या कार्यक्रमाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता मेढा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.