सातारासामाजिक

जावलीच्या राजधानीत लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा

स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– सुरेश पार्टे

मेढा. दि.१५.      मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी जावली तालुक्याची राजधानी असलेल्या मेढा नगरीत दु. १वा. छत्रपती शिवाजी महाराज (बाजार )चौकात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे .या सभेला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून, सह्याद्रीच्या डोंगर रांगातून ,दऱ्याखोऱ्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या सभेची गेल्या आठ-दहा दिवसापासून जावली तालुक्याच्या सकल मराठा समाज यांच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. नियोजनासाठी विभाग वार व गाव वार मिटिंगा निवडलेल्या समन्वयकांच्या माध्यमातून सुरू आहेत .मेढा या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे .

मेढा येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी सकल मराठा समाज जावली तालुका यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालय मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी माहिती देताना समन्वयक सदाशिव भाऊ सपकाळ म्हणाले ही लढाई कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून वंचित मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आहे .ही सभा कोणत्याही राजकीय पक्षाची नसून फक्त आणि फक्त मराठा समाजाची आहे.


कोणालाच सहानभूती मिळत नाही एवढी सहानुभूती जरांगे पाटलांना मिळत आहे. कारण जरांगे पाटील हे गेले दहा ते पंधरा वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. स्वतःच्या जीवाची परवाना करता ,स्वतःच्या कुटुंबाची परवाना करता समाजासाठी झटत आहेत. मराठा समाज बांधवांना आज आरक्षणाचे गांभीरे कळाले आहे.त्यामुळे लोक एकत्र येत आहेत .१८ नोव्हेंबर ची होणारी सभा ही जावलीच्या इतिहासातील ऐतिहासिक सभा होणार आहे. असा विश्वास व्यक्त करून तालुका समन्वयक व विभागवार असणारे समन्वयक रात्रंदिवस सभा यशस्वी करण्यासाठी काम करत असल्याचे सदाशिव भाऊ सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

स्वराज्याच्या निर्मिती साठी छ. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली होती त्याच पध्दतीने मराठयांच्या आरक्षणासाठी जावलीकरांच्या वतीने जरांगे पाटील यांना तळपती तलवार व मावळ्यांची पगडी भेट देवून सत्कार करण्यात येणार आहे.

तर यावेळी समन्वयक विलासबाबा जवळ अधिक माहिती देताना म्हणाले या सभेला लाखो मराठा युवक ,युवती ,स्त्री-पुरुष ,माता ,भगिनी उपस्थित राहणार असल्याने येणाऱ्या सर्वांसाठी पिण्याचे पाण्याची त्याचबरोबर स्वच्छतागृह तसेच सातारा मेढा ,महाबळेश्वर मेढा , मेढा कुडाळ तसेच मेढा कमान कमानीपासून आत महिला व पुरुष अशी वेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे .त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्ट्रीने खबरदारी म्हणून चारी मार्गावर ॲम्बुलन्सच गाडयांची व्यवस्था करण्यात आली आहे . नियोजनासाठी ५०० स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे .सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाने स्वतःसाठी पाण्याची बाटली, डोक्यावर टोपी अथवा टॉवेल ,रुमाल जेवणाचा डबा बरोबर आणायचा आहे .सभा बरोबर बारा वाजता सुरू होणार असून त्यापूर्वी रंगराव पाटील कोल्हापूर यांचा शाहिरी पोवड्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार आहे .तसेच तापोळा – बामनोली व वेण्णा दक्षिण विभागातून येणाऱ्या वाहनांसाठी वेण्णा हायस्कूल मैदान ,सातार कडून येणाऱ्या वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था आगलावेवाडी परिसरात तर केळकर कडून येणाऱ्या वाहनांचे पार्किंगची व्यवस्था बस स्थानक परिसरात व कुडाळ विभागातून येणाऱ्या वाहनांचे पार्किंग व्यवस्था कोर्टाच्या बाजूच्या परिसरात करण्यात आली आहे .याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे . असे सुचित केले आहे.
ही सभा ऐतिहासिक कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत .याप्रसंगी तालुक्यातील सर्व समन्वयक त्याचप्रमाणे स्वयंसेवक उपस्थित होते.

जावली तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आपआपली घर बंद करून मुलाबाळांसह या सभेला उपस्थीत राहायचे आहे असे आवाहन सकल मराठा समाज जावली तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे .

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!