
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
सातारा दि. 20 : जिल्हा रेशीम कार्यालय, वाई मार्फत तयार करण्यात आलेल्या महारेशीम अभियान रथला उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महारेशीम अभियान रथ संपूर्ण जिल्ह्यातील गावपातळीवर फिरविण्यात येणार असून या माध्यमातून रेशीम उद्योग योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीमती यादव यांनी केले आहे.



