जावलीसामाजिक

मेढा येथील अक्षय रमेश खताळ यांचे पुणे विभागातून प्रथम येऊन सहकार विभागात अधिकारी म्हणून निवड

स्टार ११ महाराष्ट्र न्यूज ——

मेढादि.०२. महाराष्ट्र शासनाच्या घेण्यात येणारे स्पर्धा परीक्षा म्हणजेच एम पी एस सी यामध्ये मेढ्याचे सुपुत्र अक्षय रमेश खताळ यांनी सहकार विभागात आपली नियुक्ती सिद्ध केली. सहकार विभागाच्या या परीक्षेमध्ये त्यांनी पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि हे यश मिळवले.

या यशाच्या पाठीमागे त्यांना त्यांच्या खताळ कुटुंबीयांनी केलेला सपोर्ट खूपच उपयोगी पडला. वास्तविक खताळ कुटुंबीय यांचा मिठाईचा पारंपरिक व्यवसाय. हा व्यवसाय करताना लागणारे मनुष्यबळ हे महत्त्वाचे असते. तरीसुद्धा मुलांना शिक्षण देताना खताळ कुटुंबीयांनी व्यवसायातून दिलेला वेळ त्यांच्या मुलांनी सार्थकी लावला.

अक्षय यांच्या भावाने डॉक्टर तर बहिणीने इंजिनियर बनवून दाखवले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षय याने बीएससी ऍग्रीकल्चर डिग्री घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षेची वाट निवडली आणि ती यशस्वीपणे पार देखील पाडली.

या यशाबद्दल संजय खताळ,दत्तात्रय खताळ,भाऊ गणेश,निखिल,डॉक्टर शुभम यांनी अभिनंदन केले. तसेच मेढा येथील भैरवनाथ युवा क्रीडा मंडळ मेढा,ग्रामस्थ मेढा, सामाजिक ,राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवरांनी आणि चांदणी चौक मेढा येथील त्याची सहकारी मित्र यांनी देखील अभिनंदन केले आणि अक्षय यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team Star11Maharashtra

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!