नवी मुंबई महानगरपालिकेचा ३२ वा वर्धापनदिन संपन्न
ग्रंथालय विभागाने सर्वाधिक पारितोषिकाची केली लयलूट
स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——-
नवी मुंबई. दि.०२ नवी मुंबई महानगरपालिकेच्या ३२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे अधिकारी, कर्मचारी वृंदाच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेत वर्धापनदिन मोठ्या उत्सवात साजरा केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या ३२ व्या वर्धापनदिन समारंभात अधिकारी, कर्मचारीवृंदाने गीत, नृत्य, नाटिका, एकपात्री अभिनय या कलागुणांचे सादरीकरण केले.
वैयक्तिक नृत्य स्पर्धेत“दिघा ग्रंथालय मधील कर्मचारी “संदिप श्रीमंत फुलारी (सहाय्यक ग्रंथपाल) यांना प्रथम क्रमांक मिळाला.
महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचार्याचा अंगभूत कला, क्रीडा गुणांना उत्तेजन मिळण्यासाठी वर्धापनदिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या जाणार्या विविध स्पर्धात्मक उपक्रमांना प्रतिसाद मिळतो आणि या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील कौशल्याचे दर्शन घडते ही बाब आनंद देणारी असल्याचे मत व्यक्त करीत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी कार्यक्रमात सहभागी कलावंत कर्मचार्यांचे कौतुक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात स्पर्धेत नवी मुंबई महानगर पालिका समुह नृत्य स्पर्ध्येत “मुख्यालय विभाग” यांना “प्रथम क्रमांक”मिळाला असून द्वितीय क्रमांक ग्रंथालय विभाग यांना मिळाला आहे.तसेच वैयक्तिक नृत्य स्पर्धेत“दिघा ग्रंथालय मधील कर्मचारी “संदिप श्रीमंत फुलारी (सहाय्यक ग्रंथपाल) यांना प्रथम क्रमांक मिळाला.तसेच महिला क्रिकेट स्पर्धा यांना द्वितीय क्रमांक मिळाला,अस्मिता काळे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषक मिळाले.नेहा ठाकूर यांना 100 मिटर धावणे यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.देवेंद्र आणि अनुश्री यांना समुह नृत्य स्पर्ध्येत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला,अनुजा पवार यांना बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला,कॅरम स्पर्धेमध्ये विनायक शिंदे यांना प्रथम क्रमांक मिळाला,कल्पना शिंदे यांना गोळा फेक स्पर्ध्येमध्ये प्रथम क्रमांक मिळाला,सारिका देवधर यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषक मिळाले.

स्पर्धकांतून उत्तम सादरीकरण करणा-या खेळाडू व कलावंतांना अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर, श्री.सोमनाथ पोटरे, श्री.दिलीप नेरकर, श्रीम.मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्री.प्रविण गाडे, शिक्षणाधिकारी श्रीम.अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्रीम.अभिलाषा म्हात्रे व श्री.रेवप्पा गुरव, विधी अधिकारी श्री.अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री.रवी जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
नवी मुंबई महानगर पालिकेतील ग्रंथालय विभागातील कर्मचारी यांनी पुस्तकाबरोबर “कला-क्रिडा” प्रकारात ही तरबेज आहेत असे दाखवून देत स्पर्ध्येतील तब्बल १० पारितोषिके मिळविली त्या बद्दल पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून या विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.