स्टार ११ महाराष्ट्र न्युज —– (अजित जगताप)
सातारा. दि.११. वडूज दिनांक खटाव तालुक्यातील हुतात्मा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडूज मध्ये पुरोगामी विचाराचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने शिक्षण माता सावित्रीबाई फुले, शिक्षिका प्रतिमा शेख मुक्ता साळवी यांची संयुक्त जयंती साजरी केली.
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ९ जानेवारी ह्या दिनी मुस्लिम, माळी , बौद्ध समाज यांच्या कडून सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवी यांची जयंती साजरी केली जाते. प्रतिमांचे पुजन करून अभिवादन केले जाते.
सर्वधर्मसमभाव व पुरोगामी चळवळीचा वारसाला लाभलेले डॉक्टर नारायण बनसोडे यांनी शिक्षण माता सावित्रीबाई फुले मुस्लिम शिक्षिका प्रतिमा शेख व मातंग समाजाच्या मुक्ता साळवी यांच्या कार्याचा गौरव करून भाषण केले. जो समाज इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. अनेकांना आपल्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या आदर्श मातांचा विसर पडलेला आहे भविष्यात अशा व्यक्तींना समाजामध्ये आता खुर्ची आहे म्हणून स्थान आहे पण खुर्ची गेल्यावर कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांनी या मातांचा आदर्श घेतला पाहिजे. अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नेहमी प्रमाणे डॅा. नारायण बनसोडे यांचे संपूर्ण माहिती पट सांगितला. कार्यक्रमाचे आभार दाऊदखान मुल्ला यांनी मानले. कार्यक्रमास महादेव सकट, ईम्रान बागवान, सिकंदर मुल्ला, मुबारक शिकलगार, मन्सूर पिंजारी, जलील मुल्ला, महमंद मुल्ला, बरकत मुल्ला, इसाक मुल्ला,याकूब बागवान, सोहेल मुल्ला, सक्लेन मुल्ला,रिजवान मुल्ला इ उपस्थित होते. वडूज नगरी व परिसरात डझनभर सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आहे. परंतु, त्यांना आपल्या भवितव्याची काळजी नसल्यामुळे ते अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत .तरीसुद्धा खऱ्या अर्थाने परिवर्तन होण्यासाठी मुठभर लोकांचेच गरज आहे. हे पुन्हा एकदा वडूज नगरीमध्ये अधोरेखित झालेले आहे. सामाजिक व राजकीय महत्वकांक्षा कुणाचेच लपून राहिलेले नाही.
परंतु ,अशा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण समाजासोबत आहे. हे दाखवण्याची संधी अनेकांना मिळते. पण त्याचा जे वापर करतात. त्यांनाच भविष्य सुद्धा उज्वल ठरू शकते. असे आता यानिमित्त नमूद करावे वाटत आहे. असे ही वक्त्यांनी स्पष्ट केले.

फोटो – वडूज नगरीमध्ये पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई प्रतिमा शेख व मुक्ता साळवी यांचे संयुक्त जयंती साजरी केली.