स्टार ११ महाराष्ट्र न्युज ——
मेढा.दि.१२. श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360 च्या कृषीलक्ष्मी सातार्याची – महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कारांसाठी शेती पूरक व्यवसायाला चालना मिळावी यासाठी अभिनव पध्दतीने वृक्षचळवळ राबविणार्या जवळवाडी ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच वर्षाताई जवळ यांची निवड करण्यात आली आहे.
जवळवाडी ता.जावली जि.सातारा येथिल वर्षाताई जवळ यांनी वृक्षलागवडीची आवड जोपासून विविध प्रकारच्या झाडांची लागवड शेतीच्या बांधावर केली असून
सर्वच महिलांनी असा उपक्रम राबवावा यासाठी त्या प्रयत्नशिल आहेत.शेतीबरोबरच किराणा व्यवसाय सांभाळीत आपल्याव कुटुंबाच्या फायद्याचा विचार न करता गुटखा, तंबाखु अशा कोणत्याही व्यसनांच्या पदार्थांची विक्री त्या दुकानात करीत नाहीत.
वटपौर्णिमा, रक्षाबंधन, वाढदिवस, पुण्यस्मरणदिन अशा विविध दिनांचे औचित्य साधून त्यांनी विविध जातीच्या हजारो देशी झाडांची रोपे महिलांना वाटप केली आहेत.आप्तजनांच्या मृत्युपश्चात स्मरणार्थ झाडांची रोपे लावून त्यांच्या स्मृती जोपासल्या जात आहेत.
“नको शाल,नको श्रीफळ आता,करू वृक्षारोपण नटवू हिरवाईने धरतीमाता” हे ब्रीदवाक्य घेवून विविध उपक्रमातून शाल-श्रीफळ देण्याऐवजी झाडांची रोपे भेट देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आहे.अकाली वैधत्व आलेल्या स्रियांच्या हस्ते वटपौर्णिमे दिवशी पतीच्या स्मृती पित्यर्थ प्राणवायु देणारी झाडांची रोपे लावून पतीच्या स्मृती जतन करणे. रक्षाबंधनला महिलांना एकत्र करून झाडांना राख्या बांधणे अशा आपल्या सातत्यपूर्ण उपक्रमांमधून शेतीला चालना मिळावी यासाठी प्रयत्नशिल असल्यामुळेच श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360॰ कृषीलक्ष्मी सातार्याची – या पुरस्कारासाठी वर्षाताई जवळ यांची निवड केल्याचे श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने पत्राद्वारे कळविले असून १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं.४ वाजता या पुरस्काराचे सातारा येथे आयोजित कार्यक्रमातून त्यांचा गौरव केला जाणार आहे.